कणकवलीत मुख्यमंत्र्यांचे स्वाभिमान पक्षाकडून स्वागत…

5

लवकरच भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची नारायण राणेंची ग्वाही…

कणकवली – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यासह स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले.स्वाभिमान पक्ष कार्यालयाजवळ हा स्वागत सोहळा झाला. यानंतर श्री.राणे यांनी आपला भाजप प्रवेश लवकरच मुंबईत होईल अशी ग्वाही दिली. तसेच कणकवली विधानसभा मतदारसंघात नीतेश राणे हेच भाजपचे उमेदवार असतील असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.