जिल्हा बँक कर्मचाऱयांकडून काळय़ा फिती बांधून कामकाज

17

वैभववाडी हेत येथील घटनेचा निषेध

वार्ताहर / दोडामार्ग:

वैभववाडी हेत येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कर्मचाऱयांवर दपडशाही व दबाबतंत्राचा वापर करून केलेल्या आरोपाबद्दल बँक एम्प्लॉईज युनिअनचे अध्यक्ष खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्हय़ातील कर्मचाऱयांना 15 ऑक्टोबरला काळय़ा फिती बांधून कामकाज करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे दोडामार्ग जिल्हा बँक शाखेतील अधिकारी व कर्मचाऱयांनी मंगळवारी काळय़ा फिती बांधून कामकाज करीत सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.

यामध्ये बँक व्यवस्थापक मारुती लाखे, विकास अधिकारी बाबा गावडे, कर्मचारी रवी नाईक, उदय ठाकर, उमेश फाटक, बहर फाटक, शालिनी शिंदे, रेणुका रेडकर, दिशा देसाई, अरुण धर्णे, बाबुराव ठाकर, रमेश ताटे आदी सहभागी झाले होते.