फळपीक विमा योजनेची मुदत 30 नाव्हेंबरपर्यंत

31

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत हवामान आधारित फळपीक विमा योजना लागू करण्यात आली असून 30 नोव्हेंबरपर्यंत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱयांनी आपला पीक विमा हप्ता भरणा करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक डॉ. सी. जी. बागल यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत आंबा, काजू या पिकांचाही समावेश आहे. कमी जास्त पाऊस, आर्द्रता, वेगाचे वारे व गारपीट यापासून आंबा व काजू या पिकांचे निर्धारित कालावधीत नुकसान झाल्यास विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य दिले जाते.   भारतीय कृषी विमा कंपनी मुंबई यांच्या माध्यमातून कर्जदार शेतकऱयांसाठी हा विमा सक्तीचा असून बिगर कर्जदार शेतकऱयांना ऐच्छिक ठेवण्यात आला आहे. आंबा व काजू या पिकासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत आपला विमा हप्ता भरणा करणे आवश्यक आहे.

आंबा पिकासाठी प्रतिहेक्टरी 6050 रुपये, काजू पिकासाठी प्रतिहेक्टरी 4250 रुपये विमा हप्ता भरावयाचा आहे. दरम्यान, गारपीट या धोक्मयापासून संरक्षण हवे असल्यास 1417 रूपये हप्ता जादा द्यावा लागणार आहे. विमा हप्ता नजीकच्या सहकारी बँकेच्या अथवा राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये विहित कालावधीत भरणा करावा. महसूल मंडळनिहाय स्वयंचलित हवामान केंद्रावरून मिळणाऱया हवामानाच्या माहितीच्या आधारे विमा संरक्षण कालावधी संपल्यापासून 45 दिवसात नुकसान भरपाई देय राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.