वैभववाडीच्या सुपुत्राची राज्याच्या हाँलीबाँल संघात निवड

वैभववाडी : वैभववाडी तालुक्याचा सुपुत्र शिवम जयवंत पवार (रा.एडगाव)याची महाराष्ट्र राज्याच्या हाँलीबाँल संघात  निवड झाली. ओडिशा येथे होणाऱ्या राष्ट्रीय हाँलीबाँल चँम्पीयनशीप स्पर्धेसाठी निवडलेल्या राज्याच्या संघात शिवम याचा  समावेश आहे.  २६जानेवारी पासून या स्पर्धेला होतोय प्रारंभ. शिवम हा कणकवली येथील एसएसपीएमएस इंजिनिअरिंग काँलेजला  शिक्षण घेतोय. त्याच्या या निवडीमुळे काँलेज प्रशासन तसेच तालुकावासीयांकडून  कौतुक होतेय.