गडद जांभळ्या रंगाचं सफरचंद कधी पाहिलंय का ?

16

सफरचंद गडद जांभळ्या रंगाचं असतं असं तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवणार नाही.पण होय, गडद जांभळ्या रंगाचंही सफरचंद असतं. गडद जांभळ्या रंगाची सफरचंदं तशी दुर्मिळ असली तरी तिबेटच्या पहाडात त्याची लागवड केली जाते.हुआनियु जातीची ही सफरचंदं चायनीज रेड डीलीशीयस म्हणूनही ओळखली जातात. डांगांग शेंग नोंग इ कॉमर्स ट्रेडिंग कंपनीने तिबेटच्या या भागात 50 हेक्टर जागेत या सफरचंदांची लागवड केलीय. सफरचंदाना गडद जांभळा रंग येण्यामागे तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. गडद पर्पल रंगाच्या सफरचंदाला ‘ब्लॅक डायमंड ऍपल’ म्हणतात.या एका फळाची किंमत तब्बल 500 रुपये आहे.या फळाला भरपूर सूर्यप्रकाशाबरोबरच अल्ट्रा व्हायोलेट किरणेही मिळतात.या किरणामुळे त्यांचा रंग गडद पर्पल होतो.त्यामुळं ही सफरचंद थोडी वेगळ्याच रंगाची दिसतात.