आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी राबविले विविध सेवाभावी उपक्रम…

8

 

वैभववाडी /प्रतिनिधी:-

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी केलेल्या आवाहनाप्रमाणे विविध सेवाभावी उपक्रम राबवत वैभववाडी माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी आपल्या सामाजिक जाणिवेचा आदर्श नमुना प्रस्तुत केला आहे.

माजी नगरसेवक संताजी रावराणे हे दरवर्षी सामाजिक उपक्रमांमार्फत लोकोपयोगी कामे करीत असतात. याहीवर्षी आम. नितेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्यामार्फत सांगूळवाडी येथील कोविड केअर सेंटरला पोषणासाठी आवश्यक असलेल्या आणि प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या १५० गावठी अंड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच सुरक्षित असणारे १०० N95 मास्कही रुग्णांसाठी देण्यात आले. तौक्ती चक्रीवादळात जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या आणि विजपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी दिवसरात्र मेहनत घेणाऱ्या लाईनमनच्या कार्यतत्परतेचा सन्मान करण्यात आला. वैभववाडी सेक्शन -1 मधील वैभववाडी नगरपंचायत क्षेत्रातील 12 लाईनमनच्या कर्तव्यदक्षतेला सलाम म्हणून त्यांना ब्रॅण्डेड कंपनीचे दर्जेदार रेनकोट देऊन सन्मानित करण्यात आले. त्यांच्या या सामाजिक जाणिवेमुळे लाईनमनांकडून समाधान व्यक्त करण्यात आले . तसेच हा त्सुत्य उपक्रम राबविल्याबद्दल भाजपा वैभववाडी तालुकाध्यक्ष नासिर काझी यांनी संताजी रावराणे यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासिर काझी, उपसभापती अरविंद रावराणे, भाजपा जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साठे, माजी महिला तालुकाध्यक्षा प्राची तावडे, भाजपा तालुका अध्यक्ष आशिष रावराणे तसेच कोविड केअर सेंटर येथील डॉ. पाताडे, माजी सभापती पवार, माजी महिला तालुकाध्यक्षा प्राची तावडे, माजी नगरसेवक संजय सावंत, प्रदीप नारकर, उदय पांचाळ, आशिष रावराणे, भाजप कार्यकर्ते, विजवितरणचे श्री. मुल्ला, तसेच लाईनमन संजय मोरे, गणेश पाटेकर, सुहास गुरव, महंमद हसन पाटणकर, समाधान कुळये, राजेंद्र गायकवाड, मंगेश पाताडे, मेघनेश पवार, मंसेश सावंत, रसूल मुकादम, अविनाश गुरव, रविंद्र लाड आदी उपस्थित होते.