पुढच्या आठवड्यात मान्सून क्षीण राहणार ; हवामान विभागाचा अंदाज. हवामानाचा आंदाज पाहून पेरणी करावी ; कृषी विभागाचे आवाहन…

8

सिंधुदुर्गनगर/प्रतिनिधी:-

हवामान विभागाच्या आंदाजानुसार पुढील आठवडयात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यतील हवामानाचा अंदाज पाहून व जमिनीतील ओलावा पाहूनच पेरणी बाबत निर्णय घ्यावा असे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आले आहे.

कृषि विभागामार्फत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. आठ दिवसापासून महाराष्ट्रात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. परंतु तो सर्वदूर सारख्या प्रमाणात नसून कोकण सोडून इतर ठिकाणी तुरळक पाऊस पडत आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या २२ जून २०२१ च्या साप्ताहिक हवामान ज्अंदाजानुसार पुढील आठवडयात पश्चिम, मध्य व दक्षिण भारतात मान्सून क्षीण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या पूर्वीच कृषि विभागाने राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १००मिलीमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये असा सल्ला दिला होता.