गोवा येथे होणाऱ्या वाको इंडिया नॅशनल किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी मुंबईच्या च्या खेळाडूंची निवड…

14

मुंबई/प्रतिनिधी:-

26 ते 29 ऑगस्टदरम्यान गोव्यात होणाऱ्या वाको इंडिया राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी बंधन हॉल, अहमद नगर येथे किकबॉक्सिंग स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र तर्फे राज्य निवड चाचणी स्पर्धा घेण्यातआली. ज्यात स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर मधील खेळाडूंनी उत्साहाने भाग घेतला आणि चांगली कामगिरी केली. श्री निलेश शेलार, (कि स्पो अ म) यांच्या अध्यक्षते खाली ही चाचणी घेण्यात आली. राहुल साळुंखे, शुभम साहू, रोशन शेट्टी, विघ्नेश मुरकर, लॅबीन जेम्स, तेजस व्हटकर, रॉबिन्सन जयराज, विंस पाटील हे खेळाडू राष्ट्रीय स्तरावरील वाको इंडिया किकबॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये मुंबई चे प्रतिनिधित्व करतील. स्पोर्ट्स किकबॉक्सिंग असोसिएशन मुंबई शहर चे अध्यक्ष श्री उमेश मुरकर म्हणाले की मुलांनी चांगली कामगिरी केल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे, आम्ही आमच्या खेळाडूंना शुभेच्छा देतो की गोव्या मध्ये उत्तम कामगिरी करावी. जे खेळाडू मुंबईचे नाव दिवसेंदिवस उज्ज्वल करत आहेत त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. आणि गोव्यामध्येही खेळाच्या भावनेने खेळ खेळण्याची इच्छा आहे आणि चांगल्या कामगिरीने मुंबईचे नाव उज्वल करतील. सदर मुलांच्या प्रशिक्षणास आणि स्पर्धा तयारि करिता गुरुकुल कृती फाऊंडेशन ट्रस्ट व एस एस के के ए संस्थेने मदत केली.