‘वाटचाल – आधुनिक शारीरिक शिक्षणाची’ अंकाचे क्रीडा राज्य मंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन…

13

कणकवली/प्रतिनिधी:-

शारीरिक शिक्षण, खेळ, क्रीडा स्पर्धा, शोध निबंध, संशोधने, शासन निर्णय, शासकीय योजना या संबंधीची माहिती शाळा-शाळांपर्यंत पोहचण्यासाठी प्रकाशित होणारे नियतकालिक ‘वाटचाल – आधुनिक शारीरिक शिक्षणाची’ या अंकाचे प्रकाशन क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

29 ऑगष्ट या राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून या अंकाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा क्रीडा संकुल, अ. नगर येथे राष्ट्रीय कीडा दिन सोहळ्याचे आयोजन केले होते. या वेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, महाराष्ट्र खेलो इंडिया स्पर्धेत अव्वलस्थानी असताना, खेलो इंडियाचे जास्तीत जास्त प्रस्ताव केंद्राला पाठवले, पण त्या तुलनेने कमी सेंटर महाराष्ट्राला मिळाले. त्यासाठी राज्यसरकार केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. खेळाडूंना क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यास शासन तत्पर असून तालुका क्रीडा संकुलाच्या निधीत एक कोटीवरून पाच कोटीपर्यंत निधीत भरघोस वाढ केली आहे. प्रमाणपत्र व्हेरीफिकेशन प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्याबाबत शासन आश्वासक पावले उचलत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संग्राम जगताप यांनी क्रीडा विकासासाठी व शिक्षकांच्या प्रश्नांच्या सोडवणूकीसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले.

या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश मोहारे, ज्ञानेश्वर खुरंगे, आपासाहेब शिंदे, माणिकराव विधाते, किसनराव लोटके, महेंद्र हिंगे, सुनील गागरे, शिरीष टेकाडे, भाऊसाहेब रसाळ, सुनील जाधव, विजय मिस्कीन, गणेश म्हस्के, घनःशाम सानप, राजेंद्र कोतकर, नंदकुमार शितोळे, बाबासाहेब बोडखे, सुनील दानवे, सुधाकर सुंबे, भाऊसाहेब बेंद्रे, दिनेश भालेराव, हनुमंत गिरी आदी मान्यवर उपस्थित होते.