सावधान! करुळ घाटात दरडीचा धोका; आज मोठा दगड आला रस्त्यावर…

24

वैभववाडी/प्रतिनीधी:-

तालुक्यात कोसळणाऱ्या मुसळधार पाऊसामुळे सोमवारी  करुळ घाटात भला मोठा दगड रस्त्यावर आला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. सुदैवाने त्या दरम्यान वाहन असते तर मोठा अनर्थ घडला असता.

तालुक्यात गेले आठ दिवस जोरदार पाऊस पडत आहे. या पावसाने करुळ घाटात चेकपोस्ट पासून सुमारे ४ कि. मी. अंतरावर डोंगरातून भला मोठा दगड रस्त्यावर आला होता. याबाबत वैभववाडी पोलिसांना माहिती मिळताच वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह करुळ घाटात धाव घेतली.जेसीबीच्या सहाय्याने दगड बाजूला करुन वाहातूक सुरळीत केली आहे.