कोकण आपत्ती व्यवस्थापनाअंतर्गत रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी २२०० कोटी; ना. उदय सामंत यांची माहिती…

36

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-

कोकणात काही वर्षांत वारंवार येणाऱ्या पूरस्थितीमुळे कोकणातील व्यापारी व नागरिकांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. नुकत्याच आलेल्या पूरस्थितीत रत्नागिरी जिल्ह्यासह रायगड व सिंधुदुर्गमध्ये मोठे नुकसान झाले होते. यासाठी ३७०० कोटींचा कोकण आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला असून, यातील जवळपास २२०० कोटी रुपये रत्नागिरी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी मिळणार असल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन पत्रकार परिषदेत सांगितले आहे.