45 व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीला सुरुवात;  निर्णयाकडे संपूर्ण देशाचं लक्ष…

17

नवी दिल्ली/प्रतिनिधी:-

आज जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी कौन्सिलची 45 वी बैठक शुक्रवारी 17 सप्टेंबर रोजी लखनऊमध्ये होत आहे. यामध्ये चार डझनहून अधिक वस्तूंवरील कर दराचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे. कोविड -19 शी संबंधित 11 औषधांवरील कर सवलत 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्याचा निर्णय देखील घेतला जाऊ शकतो. या बैठकीत पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) कक्षेत आणण्यासंदर्भातील महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज संपूर्ण देशाचं या बैठकीकडे लागून राहिलं आहे.