कणकवलीत मटका बुकीवर पोलीस कारवाई…

6

कणकवली/प्रतिनिधी:-

कणकवली शहरातील भाजी मार्केट येथे मुंबई मटका स्वीकारत असल्याप्रकरणी कणकवली पोलिसांच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात संजय श्रीधर राजपूत ( ३५ रा. कलमठ, गोसावीवाडी) यांच्या ताब्यातून मुंबई मटक्याचे साहित्य व रोख रक्कम ३ हजार ९०० रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास केली.

कणकवली शहरातील भाजी मार्केट नजिक एका स्टॉलमध्ये मुंबई मटका स्वीकारला जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात रोख रक्कम ३ हजार ९०० रुपये व मटक्यासाठीचे साहित्य जप्त करण्यात आले. कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.या प्रकरणी पोलिस नाईक विनायक खेंडकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास कणकवली पोलिस करत आहेत.