दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसच्या वेळेत बदल…

मुंबई/प्रतिनिधी:-

मध्य रेल्वेने ट्रेन क्रमांक 01015 दिवा- सावंतवाडी एक्स्प्रेसच्या दिवा येथून सुटण्याच्या वेळा दि. २५.११.२०२१ पासून बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी दि. २५.११.२०२१ पासून दिवा येथून ०६.५५ च्या विद्यमान सुटण्याच्या वेळेऐवजी दिवा येथून ०६.२५ वाजता सुटेल. 10105 दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसच्या सुधारित आगमन/निर्गमनाच्या वेळा दि. २५.११.२०२१ पासून खालीलप्रमाणे असतील – कळंबोली येथे ०६.३९/०६.४० वाजता (०७.१८/०७.१९ वाजता), पनवेल ०७.२०/०७२५ वाजता (०७.२८/०७.३० वाजता), आपटा ०७.४४/०७.४५ वाजता (०७.४९/०७.५० वाजता), जिते ०७.५४/०७.५५ वाजता (०७.५९/०८.०० वाजता). ब्रॅकेटमध्ये दर्शविलेल्या वेळा विद्यमान आगमन/निर्गमन वेळा आहेत. थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना विनंती आहे की, कोणत्याही प्रकारची गैरसोय टाळण्यासाठी वेळेतील बदलाची कृपया नोंद घ्यावी.