अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सत्कार…

9

कणकवली/प्रतिनिधी:-

अर्जुन पुरस्कार प्राप्त सिंधू कन्या हिमानी परब हिचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सत्कार करण्यात आला.

मल्लखांब या क्रीडा प्रकारात बजावलेल्या उत्तुंग यशाबद्दल हिमानी परब हिला अर्जुन पुरस्कार मिळाल्याबद्दल तिचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन तिच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

सत्कार करताना ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक, जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर, कणकवली तालुका कार्याध्यक्ष हनीफ भाई पीरखान , कणकवली तालुका सदस्य प्रवीण गायकवाड, मनोज वारे, कुडाळ तालुका सदस्य गणेश मेस्त्री, प्रमिला वाडकर आदी उपस्थित होते.