अर्जुन रावराणे विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पठाण सर यांचे निधन…

16

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी येथील अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी मुख्याध्यापक शफीक मोहम्मदउस्मानखान पठाण

यांचे आज सकाळी वयाच्या ८० व्या वर्षी दुःखद निधन झाले. अर्जुन रावराणे विद्यालय व कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालया मार्फत पठाण सर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रशालेचे संस्था अधिक्षक जयेंद्र रावराणे मुख्याध्यापक नादकर सर, शिंदे सर व शिक्षक व कर्मचारी वर्गाकडून पठाण सर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांकडून देखील सोशल मीडियावर पठाण सर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी,नातवंडे असा परिवार आहे.