मराठा सेवा संघाच्यावतीने बँक संचालक समीर सावंत यांचा सत्कार…

14

कणकवली/प्रतिनिधी:-

सिंधुदुर्ग मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी कै.रमाकांत सावंत यांचे पुत्र समीर रमाकांत सावंत यांची निवड झाली. त्याबद्दल मराठा सेवा संघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष एस.टी. सावंत यांच्या हस्ते नवनिर्वाचित बँक संचालक समीर सावंत यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मराठा सेवा संघाचे नेते लवू वारंग, कोकण उपाध्यक्ष एस.एल. सपकाळ, अविनाश राणे,निळकंठ वारंग, आर. जी. सावंत,श्री.सावंत,पत्रकार भगवान लोके आदींसह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.