एडगाव (पाष्टेवाडी) येथे बसला भीषण आग; सुदैवाने जिवीत हाणी टळली…

11

वैभववाडी/प्रतिनिधी:-

आज पहाटे पुण्याहून गोव्याला जाणारी मनीषा ट्रॅव्हल बस वैभववाडी नजीक एडगाव (पाष्टेवाडी) येथे आली असता चालत्या बसने पेट घेतल्याने बसचे सुमारे दहा लाखाचे नुकसान झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा व प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा भडका एवढा होता की बस पूर्णता जळून खाक झाली. करूळ चेक पोस्ट सोडल्यानंतर काही अंतरावर चालकाला अंदाज आल्याने बस उभी करून पाहिले असता शॉर्टसर्किटने गाडी जळत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी चालकाने आणि क्लिनर प्रवाशांना तात्काळ गाडीतून खाली उतरण्यास सांगितले आणि गाडीत असणारे पाणी आणि छोटा सिलेंडर च्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु आगीचा भडका असल्यामुळे आग विजवू शकले नाही. बस पूर्णता जळून खाक झाली. गाडीत एकूण 37 प्रवासी प्रवास करत होते.

यावेळी पोलीस कॉन्स्टेबल शैलेश कांबळे, संदीप कांबळे, अभिजीत धावडे, विलास राठोड, संतोष शिंदे, आरती झाडे, इत्यादी पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विजवण्यासाठी पहाटेच धाव घेतली.