नितेश राणे सुपारीबाज आमदार; माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा घणाघात…

कणकवली/प्रतिनिधी:-

संतोष परब हल्ल्यात आमदार नितेश राणेंना २ दिवस पोलीस कोठडी मिळाल्यानंतर आमदार नितेश राणे हे आता सुपारीबाज आमदार म्हणून राज्यात ओळखले जातील अशा शब्दांत माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर घणाघात केला.संतोष परब हल्ल्याचा आणि पोलीस तपासाचा घटनाक्रम सतीश सावंत यांनी उलगडून सांगितला.२८ ऑगस्ट २०२१ रोजी संतोष परब याचा फोटो नितेश राणेंच्या व्हाट्सएपवरून संतोष परबवर मारेकरी पाठवणाऱ्या सचिन सातपुते ला पाठवला गेला. संतोष परब वर हल्ला करण्यासाठी नितेश राणेंनी सचिन सातपुते याला सांगितले होते. दिल्लीमधून सातपुते ला अटक केल्यानंतर सातपुते कडून पोलीस तपासात नितेश राणेंचे नाव उघड झाले. त्यामुळे विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्याना मारण्यासाठी सुपारी देऊन खुनी हल्ला करायला लावणारे नितेश राणे आता राज्यात सुपारीबाज आमदार म्हणून ओळखले जातील अशा शब्दांत सतीश सावंत यांनी हल्लाबोल केला.