कुसूर बाजारपेठ येथे २३ मार्च २०२२ ते २७ मार्च २०२२ पर्यंत भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

49

वैभववाडी/प्रतिनिधी:-

युवाशक्ती मित्रमंडळ कुसूर बाजारपेठ आयोजित भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धा दिनांक २३ मार्च २०२२ ते २७ मार्च २०२२ रोजी आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रथम पारितोषिक रोख .रू .५०००० / – आणि चषक, द्वितीय पारितोषिक रोख ३०००० / – आणि चषक, तृतीय पारितोषिक रोख रू . १५००० / – आणि चषक, चतुर्थ पारितोषिक रोख रु .५०००/ – आणि चषक. इतर आकर्षक चषक फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, मालिकावीर अंतिम सामन्यातील सामनावीर, शिस्तबद्ध संघ. प्रवेश फी रु . ५००० / – असुन कृपया इच्छूक संघांनी आपली नोंदणी फी रु . २५०० / – दिनांक १२ मार्च २०२२ पर्यंत जी – पे . करून आपल्या संघाची नोंदणी निश्चित करावी. असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे. स्पर्धेचे ठिकाण – कुसुर बाजारवाडी, ता.:-वैभववाडी.