खेड येथे झालेल्या अपघातामध्ये देवगड तालुक्यातील दोन जण ठार…

12

देवगड/प्रतिनिधी:-

खेड येथे झालेल्या अपघातामध्ये देवगड तालुक्यातील दोन जण ठार झाले असून एक जण किरकोळ जखमी झाला असून सदरची घटना 30 एप्रिल रोजी मध्यरात्री १२.४५ सुमारास घडली असून अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे

मिळालेल्या माहितीनुसार तारीख 30 एप्रिल रोजी मध्यरात्री १२.४५ भोगाव संत तुकाराम मंदिर शेजारी मुंबई दिशेकडून वाशी नवी मुंबई ते देवगड दिशेकडे जाणारी बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच.07/ एजे/2187 व जयगड ते ठाणे मुंबईकडे जाणारा ट्रक क्रमांक एम/04/ एफपी/2287 यांच्यात समोरासमोर ठोकर होऊन अपघात झालेला आहे.अपघातातील दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरात ठोकर झाल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले असले तरी या अपघातामध्ये देवगड तालुक्यातील दोन जण ठार झाल्याची घटना समोर आली आहे नारिंग्रे गावांमधील असून दुसरा मुंगे गावातील असल्याचे समजते मुणगे हे गंभीर दुखापत होऊन जागीच मयत झालेले आहेत तसेच उमेश उत्तम कोयंडे वय- 24 राहणार देवगड यांना किरकोळ व गंभीर दुखापत झालेल्या आहेत.अपघातातील दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.