वाभवे विकास सोसायटी चेअरमनपदी सुरेंद्र रावराणे यांची बिनविरोध निवड…

8

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वाभवे विकास विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमन पदी सुरेंद्र रावराणे तर व्हा.चेअरमन पदी नगरसेवक रणजित तावडे यांची बिनविरोध झाली. निवडीनंतर शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक प्रदीप रावराणे यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

वाभवे सोसायटीच्या चेअरमन व व्हा.चेअरमन पदाची आज निवडणूक होती.ही निवड प्रक्रिया बिनविरोध झाली.यापूर्वी सोसायटीची निवडणूकही बिनविरोध झाली होती.निवडणूक निर्णय अधिकारी सुनीता भोगले यांच्या उपस्थित हि निवड प्रक्रिया पार पडली. नवनिर्वाचित चेअरमन व व्हा.चेअरमन यांच संचालकांनी अभिनंदन केले. यावेळी नगरसेवक तथा संचालक प्रदीप रावराणे, गुलाबराव चव्हाण, सानिका रावराणे, शिवाजी राणे, संतोष मांजरेकर, सुर्यकांत सावंत,शरद तांबे,सचिन माईणकर, रजीता रावराणे, दत्तात्रय इंदप,सचिव विजय सावंत आदी उपस्थित होते.