करुळ सोसायटीवर भाजपाची 12 जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता…

16

कणकवली/प्रतिनिधी:-

शिवसेनेकडून कणकवली तालुक्यातील प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटीत भाजपने 12 जागांवर विजय मिळवतभाजपने 12 जागांवर विजय मिळवत शिवसेनेची स्वप्ने धुळीस मिळवली. शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांसह वरिष्ठ नेत्यांनीही या निवडणुकीकडे विशेष लक्ष दिले होते. या सोसायटीमध्ये कणकवली तालुक्यातील कोंडये, करूळ,हुबरट, बेळणे हे गाव येत असताना या प्रत्येक गावांची जबाबदारी विभागून देण्यात आली होती. तसेच भाजपाकडून केलेल्या गोट्या सावंत यांच्या नियोजनाचा पुन्हा एकदा या निवडणूक निकालात करीष्मा दिसून आला. शिवसेनेकडून या सोसायटीवर 100 टक्के विजय मिळणार असा खाजगी दावा केला जात असताना मात्र शिवसेनेची स्वप्ने अक्षरशः धुळीस मिळत त्याची राखरांगोळी झाली. करूळ, हुंबरट या दोन गावांमधील दिग्गज राजकीय व्यक्ती देखील या निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेत जातीनिशी सहभागी झाल्या होत्या. हुंबरट चे माजी सरपंच दिलीप मर्ये यांचा या निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. नवनिर्वाचित 12 संचालकांचे आमदार नितेश राणे यांनी देखील विशेष अभिनंदन केले आहे. विजयी संचालकामध्ये यशवंत चाळके 199, विनायक गोमणे 198, मंगेश कर्णिक 210, सहदेव केसरकर 197, आनंद परब 198, रवींद्र फोपे 201, अनंत तेली193, वसंत तेंडुलकर 207, संध्या आचार्य 198, सरिता ठाकूर 202, महेंद्र पांचाळ 199, विनोद तांबे 205, या उमेदवारांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. संदीप सावंत, राजू हिर्लेकर, यांनी या निवडणुकीच्या विजयासाठी महत्वाची भूमिका निभावली. तर भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, भाई आंबेरकर, काका गोमने, प्रकाश दळवी,सुयोग माणगांवकर,करूळ सरपंच वासुदेव कर्णिक,शैलेश आचार्य यांनी विजयी संचालकांचे अभिनंदन केले.