नानिवडे गावच्या श्री एकविरादेवी मंदिराचा 15 वा वर्धापनदिन 9 मे रोजी…

16

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी तालुक्यातील नानिवडे गावच्या श्री एकविरादेवी मंदिराचा 15वा वर्धापनदिन 9मे 2022रोजी नानिवडे येथे साजरा करण्यात येणार आहे .वर्धापनदिन निम्मित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच या कार्यक्रमानिम्मित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन देखील करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला वैभववाडी तालुका तहसीलदार रामदास झळके उपस्थित राहणार आहेत. श्री एकविरादेवी उत्सव व ग्रामविकास मंडळ ,नानिवडे यांच्याकडून देवीच्या मंदिराच्या वर्धापनदिना च्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आली आहे.