मोठी बातमी! इयत्ता १२ वीचा निकाल १० जूनपर्यंत, तर दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर होणार…

मुंबई/प्रतिनिधी:-

राज्यात इयत्ता १२ वीचा निकाल (HSC Result) १० जूनपर्यंत तर इयत्ता १० वीचा निकाल (SSC Result) २० जूनपर्यंत जाहीर केला जाईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या पेपर तपासणीचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. आता दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या निकाल तयार करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत इयत्ता १२ वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करणार असून दहावीचा निकाल २० जूनपर्यंत जाहीर केला जाईळ, अशी माहिती शिक्षण मंडळानं दिली आहे.