वैभववाडी येथे रेल्वे ट्रॅक वर आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह…

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी तालुक्यातील आचिर्णेगावानजीक रेल्वे ट्रॅकवर अनोळखी महिलेचा मृतदेह आज सकाळच्या सुमारास आढळून आला आहे. रेल्वेच्या धडकेत या महिलेचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.अचिर्णे गावालगत घडली घटना, मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी वैभववाडी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.