
वैभववाडी/प्रतिनिधी:-
श्री शंकर प्रासादिक विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा सोसायटी नाधवडेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी अनुक्रमे भाजपाचे अनिल दत्ताराम नारकर आणि संतोष रामचंद्र पेडणेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
या सोसायटीवर भाजपाचे वर्चस्व कायम राखण्याकरिता भाजपाचे माजी जि.प.सदस्य सुधीर नकाशे, माजी उपसभापती बंड्या मांजरेकर, भाजपा सोशल मीडिया तालुकाध्यक्ष बाबा कोकाटे, माजी तालुकाध्यक्ष सुहास सावंत आणि अनिल नारकर यांची निर्णायक खेळी महत्वाची ठरली.
