वैभववाडीत वीज खंडित होण्याचे प्रकार,लोक त्रस्त…

वैभववाडी/प्रतिनिधी:-

वैभववाडी तालुक्यातील लोक साखर झोपेत असताना रात्रीची वीज गायब होण्याचे प्रकार वाढले असून आधीच उकाड्याने हैराण झालेले लोक त्रस्त झाले आहेत.त्यामुळे वीज मंडळाच्या कारभाराबाबत तीव्र नाराजी ऐकायला मिळत आहेत.

वैभववाडी तालुक्यातील. एडगाव,सोनाळी,वाभवे ,करूळ इत्यादी गावातील लोक रात्रीचे साखर झोपते असताना वीज गायव होत असल्याच्या तक्रारी आहेत.सध्या घरोघरी चाकरमानी आणि त्यांची मुले बाळे गावी आले आहेत.पाऊस,वादळ,किंवा वीज चमकत नसताना वीज गायब होत आहे.त्या मुळे आश्यर्य व्यक्त केले जात आहे.आधीच उकाड्याने हैराण झालेले लोक वीज वारंवार खंडित होत असल्याने त्रासले आहेत.विशेष म्हंणजे लोक रात्री शांत झोपलेले असताना वीज गायब होत आहे. वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित समस्या दूर करावी अशी मागणी होत आहे.