कोकणकन्येच्या इंजिनमध्ये बिघाड…

9
वैभववाडी/प्रतिनिधी:-
कोकण रेल्वे मार्गावरील विलवडे स्थानकाजवळ कोकणकन्या एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला आहे.  दोन तासांपेक्षा जास्त वेळ कोकणकन्या एक्सप्रेस एकाच ठिकाणी रखडली होती. यानंतर थोड्या वेळापूर्वी रत्नागिरी-कोकण कन्या एक्सप्रेसच्या बंद पडलेल्या इंजिनला नवीन इंजिन जोडलं आहे. बंद पडलेली कोकण कन्या एक्सप्रेस निवसर स्थानकात आणली आहे. मात्र ऐन सुट्टीच्या काळत हे घडल्याने प्रवाशांचे हाल झाले आहेत.

मात्र कोकण कन्या एक्सप्रेस चे इंजिन बंद पडल्यामुळे अनेक रेल्वेगाड्या विविध स्टेशनमध्ये अडकुन होत्या. तुतारी, मंगला एक्सप्रेस या गाड्या खोळंबल्या होत्या.

पहाटे 6 : 21 वाजताच्या सुमारास इंजिनमध्ये बिघाड झाला. यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या खोळंबल्या गेल्या. तर दुसऱ्या रेल्वेचे इंजिन लावून ही एक्सप्रेस पुढच्या स्थानकात थांबवली.