मुंबईहून मालवणला रिक्षाने आलेली ऋतुजा राणे बनली ‘मालवण सुंदरी’…

12

मालवण/प्रतिनिधी:-

मालवण नगरपरिषद आणि जिल्हा नियोजन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दांडी समुद्रकिनारी सुरू असलेल्या मालवण पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित ‘मालवण सुंदरी’ चा किताब स्पर्धेसाठी आई-वडिलांसमवेत रिक्षाने मुंबईहून मालवण गाठणा-या काळसे येथील ऋतुजा राणे हिने पटकाविला.

तब्बल १६ तासांचा रिक्षा प्रवास करीत ती मालवणला आली अन् सर्वच प्रेक्षक आणि परीक्षकांची मने तिने जिंकली. पूजा राणे हिला द्वितीय तर तन्वी वेंगुर्लेकरला तृतीय क्रमांक मिळाला.