कणकवलीतील शासकीय ठेकेदार निखिल घेवारी यांना नारायण राणे यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण…

8

कणकवली/प्रतिनिधी:-

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सिंधुदुर्ग औद्योगिक महोत्सवाचा आज कणकवली त शुभारंभ झाला. या महोत्सवादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा ठेकेदार निखिल घेवारी यांना यांत्रिकीकरण करिता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्याच्या माध्यमातून तब्बल 30 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले. शासनाच्या सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग खात्याच्या या महोत्सवामुळे युवकांमधून उद्योजक घडतील . मी स्वतः शासकीय ठेकेदार असून विविध कामे करत असताना अद्ययावत यांत्रिक उपकरणाची गरज भासते , मात्र यांत्रिक सुविधा नसल्यामुळे ही कामे मनुष्यबळाच्या आधारे करावी लागतात. यामुळे वेळ आणि पैसा याचा अपव्यय होतो. या रकमेतून अद्ययावत मशनरी खरेदी करून जलद गतीने कामे करण्यास मला मदत होणार आहे. अशी माहिती निखिल घेवारी यांनी दिली. सिंधुदुर्ग मधील होतकरू नवं उद्योजक तरुणांच्या हाताला बळकटी देत आर्थिक पाठबळ मिळवून दिल्याबद्दल केंद्रीय उद्योग उद्योग मंत्री नारायण राणे यांचे आभार मानत असल्याची प्रतिक्रिया निखिल घेवारी यांनी व्यक्त केली आहे.