वृध्द महिलेचा मृतदेह सापडला घरानजीकच्या विहीरीत; अचिर्णे येथील धक्कादायक घटना…

23

वैभववाडी/प्रतिनिधी:-

आर्चिणे माळवाडी येथील सुमती मनोहर रावराणे वय-८० या वृध्द महिलेचा मृतदेह घरानजीकच्या विहीरीत आज (ता.२५) सकाळी आढळुन आला.तिने आत्महत्या केली असावा असा पोलीसांचा अंदाज आहे.

आर्चिणे माळवाडी येथे श्रीमती रावराणे यांचे घर आहे.घरात त्या एकट्याच राहत होत्या.त्यांना मधुमेहाचा त्रास आहे.काल सायकांळी त्या शेजारी राहणाऱ्या लोकांना दिसल्या होत्या.दरम्यान आज सकाळी श्रीमती रावराणे यांच्या घराचा दरवाजा बंद होता.त्यामुळे शेजाऱ्यांनी चौकशी केली असता त्या घरात देखील कुठे दिसुन आल्या नाहीत.त्यामुळे आजुबाजुला त्यांचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह विहीरीत आढळुन आला.ही माहीती मिळाल्यानंतर शेजाऱ्यांनी गावातील सिध्दाचीवाडी येथे राहत असलेल्या त्यांचा मुलगा दिलीप मनोहर रावराणे याला दिली.त्याने ही यासंदर्भात पोलीसांना माहीती दिल्यानंतर वैभववाडी पोलीस घटनास्थळी पोहोचले.त्या वृध्द महिलेने आत्महत्या केली असावी असा पोलीसांचा प्राथमीक अंदाज आहे.श्रीमती रावराणे यांना तीन मुलगे असुन दोन मुंबईला तर एक गावी राहतो.शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.