आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोळपे जि.प. मतदारसंघात विद्यार्थ्यांना 4000 वह्यांचे वाटप…

40

वैभववाडी/प्रतिनिधी:-

आमदार नितेश राणे यांनी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून मतदार संघात विकास कामे मार्गी लावली आहेत. विरोधी पक्षाचा आमदार असताना देखील मतदार संघातील प्रत्येक मागण्या पूर्ण करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. काही कामे स्वखर्चाने त्यांनी मार्गी लावली आहेत. मतदारसंघात शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे. मिळालेल्या सुविधांचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी दर्जेदार शिक्षण घेतले पाहिजे. असे प्रतिपादन भाजपा जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष हुसेन लांजेकर यांनी व्यक्त केले.
आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कोळपे जिल्हा परिषद मतदार संघातील सर्व विद्यालयात 4000 वह्यांचे वाटप करण्यात आले. गुरुवारी नानिवडे, तिथवली, कोळपे व मांगवली येथील विद्यालयात वह्या वाटप करण्यात आले. कोळपे येथील कार्यक्रमात हुसेन लांजेकर बोलत होते. याप्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र साठे, जिल्हा कार्यकारणी सदस्य राजेंद्र राणे, सरपंच आयशा लांजेकर, उपसरपंच बाबाला लांजेकर, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मज्जीद नंदकर, मुख्याध्यापक हबीबुल्ला, हमीद लांजेकर, शिराज नाचरे, रमजान चोचे, तोपिक नंदकर व कार्यकर्ते ग्रामस्थ व पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दहावी व बारावीच्या परीक्षेत गावच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. विद्यार्थ्यांनी मिळणाऱ्या सुविधांचा पुरेपूर वापर करून उचित ध्येय गाठले पाहीजे. असेच यापुढे यश मिळवून गावचं व आपल्या आईवडिलांचे नाव उज्वल करा. असे लांजेकर यांनी सांगितले. नासीर काझी यांनी मनोगत व्यक्त केले.

भुईबावडा, नेर्ले व हेत येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना देखील वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच दहावी व बारावी इयत्तेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.