वैभववाडी तालुक्यात चार ग्रामपंचायतींवर भाजप पुरस्कृत उमेदवार बिनविरोध…

21

वैभववाडी/प्रतिनिधी:-

तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने जोरदार मुसंडी मारली आहे. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध भाजपाकडे आल्या आहेत. त्यामध्ये उपळे, जांभवडे, अरुळे व निम-अरुळे या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. सर्व नूतन सरपंच यांचे आमदार नितेश राणे यांनी अभिनंदन केले.

आमदार नितेश राणे यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून चारही गावातील ग्रामस्थांनी भाजपचे सरपंच जाहीर केले आहेत. अरुळे ग्रामपंचायत सरपंचपदी मानसी नितीन रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निम -अरुळे ग्रामपंचायत सरपंचपदी सज्जन दत्ताराम माईणकर यांची निवड झाली आहे. तसेच संपूर्ण सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. उपळे ग्रामपंचायत सरपंचपदी दक्षता देवानंद पालांडे यांची बिनविरोध निवड जाहीर झाली आहे. तसेच संपूर्ण सदस्य भाजपचे बिनविरोध निवडून आले आहेत. जांभवडे सरपंचपदी मानसी मंगेश पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. सर्व सदस्य ही बिनविरोध निवडून आले आहेत. वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासिर काझी यांनी सर्व सरपंच व सदस्य यांचे अभिनंदन केले आहे. तालुक्यात १७ ग्रामपंचायती च्या निवडणूका होत आहेत. आज छाननी पार पडली. बुधवारी माघारी दिवशी आणखी चित्र स्पष्ट होणार आहे.