नाहीतर तो कचरा नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर दिसेल; मनसे माजी शहरअध्यक्ष विशाल ओटावणेकर आक्रमक…

13

जुबेर खान/मालवण:-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे पर्यटणाचे मुख्य केंद्र बिंधू आहे. या ठिकाणी देश विदेशतून लाखो पर्यटक पर्यटणासाठी येत असतात त्याच मालवण शहरामध्ये ठीक ठिकाणी असलेल्या कचऱ्याचा ढीग हे कुठे तरी मालवण चा बदनाम होत असल्याचे दिसून येत आहेत या सर्व गोष्टींसाठी मालवण नगरपालिका जबाबदार असल्याचा आरोप मनसे मालवण माजी शहरप्रमुख विशाल ओटावणेकर यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे केला आहे.

स्वच्छ आणि सुंदर मालवण शहराचा एकीकडे नारा देणाऱ्या मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या स्वच्छता कामगारांना पगार न देताच ठेकेदाराने थेट ठेका दिपक सोडल्याने मालवणात कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली असून मुख्य रस्ते व परिसर वगळता अन्य भागात कचऱ्याचे ढिगच्या ढीग साचले. दरम्यान, आठवड्याभरापूर्वी संबंधित ठेकेदाराने आपण ठेका सोडत असल्याने एक डिसेंबर पासून कामावर येऊ नये असे कंत्राटी कामगारांना सांगितले, तर नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कंत्राटी कामगारांच्या ठेक्यापोटी धनादेशच न दिल्याने ठेकेदाराने ठेका सोडल्याचे ठेकेदार प्रतिनिधींनी सोमवारी पगारा विषयी जाब विचारण्यास गेलेल्या कामगारांना सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

मालवण नगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कामगारांच्या पगाराबाबत संबंधित ठेकेदाराकडून अनेक वेळा विलंब झाल्याने, तसेच ठरलेल्या पगारापेक्षा कमी पगार दिला गेल्याने तसेच काहीवेळा पगार ठेवल्याच्या निषेधार्थ यापूर्वी कंत्राटी स्वच्छता कामगारांनी अनेक वेळा काम बंद आंदोलन छेडले होते.मात्र हा प्रश्न त्या त्या वेळी काही अंशी सोडवून पगाराबाबत पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत असल्याने कामगारांना काम बंद आंदोलनाचे हत्यार वारंवार उपसावे लागले होते.

या सर्व गोष्टींचा परिणाम मालवण च्या स्वच्छतेवर होत असल्याचा दिसून येत आहे. मालवण नगरपालिकेने या वर लवकरात लवकर तोडगा काढावा व मालवण शहर हे स्वच्छ करावे नाहीतर मनसे नेते जी जी उपरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहरातील कचरा मालवण नगरपालिकेच्या मुख्य द्वारावर आणून फेखू असं ही ओटावणेकर यांनी सांगितले आहे.