वैभववाडीतील शिक्षकांना गणित पुरस्कार जाहीर…

11

वैभववाडी/प्रतिनिधी:-

सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाच्या वतीने वैभववाडी तालुक्यातील ५ शिक्षकांची ”जिल्हा गणित शिक्षक पुरस्कारासाठी” निवड केली आहे. तालुकाध्यक्ष एस.बी.शिंदे यांनी पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. वाडा हायस्कूल ता. देवगड येथे रविवार दि. ५ फेब्रुवारी २०२३ रोजी होणाऱ्या जिल्हा गणित मेळाव्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

पुरस्कार विजेते शिक्षक –डी.एस.पाटील नाधवडे,एस.ए.कुंभार कोकिसरे,ए.ए.डिग्रजे तिथवली,पी.डी.सावंत नावळे धनगरवाडा,श्रीम.पी.एन.भोवड वैभववाडीहायस्कूल.