माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालेत शासकीय विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन…

13

कणकवली/प्रतिनिधी:-

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी प्रशालीतील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणाबरोबर स्पर्धा परीक्षांचे ज्ञान व्हावे, म्हणून प्रशालेमध्ये विविध उपक्रम घेतले जातात.जेणे करून मुलांना स्पर्धेच्या युगामध्ये शासकीय सेवेमध्ये करिअर घडवण्यासाठी संधी मिळू शकते.मुलांना विविध स्पर्धा परीक्षांचे माहिती मिळावी म्हणून सोमवार दिनांक 30-01-2023 रोजी मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर कनिष्ठ अनुवाद अधिकारी मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार यांनी विविध स्पर्धा परीक्षा कोणत्या आहेत,आणि त्याची तयारी विद्यार्थ्यानी शालेय जीवनापासून कशी करावी त्याचे मार्गदर्शन केले.

यावेळी कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई चे विद्यमान अध्यक्ष सन्मा. श्री. सतीशजी सावंत संस्थेचे सरचिटणीस श्री.शिवाजी सावंत, सदस्य श्री.नागेश मा.सावंत, प्रशालेचे चेअरमन श्री.आर.एच. सावंत सर, मुख्याध्यापक तथा प्राचार्य सन्मा. श्री. सुमंत दळवी, पर्यवेक्षक सन्मा. श्री. बयाजी बुराण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.