शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी सहकार विभागाने पाठपुरावा करावा – सहकार मंत्री अतुल सावे यांचे निर्देश…

61

मुंबई/प्रतिनिधी:-

मोसमी पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले आहेत. शेतकरी खरीप हंगामाची पूर्व तयारी करीत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बि- बियाणे, रासायनिक खतांच्या खरेदीसाठी बँकांनी पीक कर्ज वेळेत द्यावे आणि त्याचा पाठपुरावा सहकार विभागाने करून अहवाल सादर करावा, असे निर्देश राज्याचे सहकार व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज दिले.

सहकार मंत्री श्री. सावे यांच्या दालनात त्यांच्या अध्यक्षतेखाली सहकार विभागाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सहकार व पणन विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, उपसचिव संतोष खोरगडे, नितीन गायकवाड, श्री. शिंगाडे, विशेष कार्य अधिकारी तथा अवर सचिव श्रीकृष्ण वाडेकर, साखर संचालक उत्तम इंदलकर, कक्ष अधिकारी अनिल चौधरी, राहुल शिंदे उपस्थित होते, तर साखर आयुक्त शेखर गायकवाड, सहकार आयुक्त अनिल कवडे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मंत्री श्री. सावे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज पुरवठ्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार सहकार विभागाने कार्यवाही करावी.