संजय राऊत, उद्धव ठाकरेंना करतात ब्लॅकमेल ; भाजप नेते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट…

29

कणकवली/प्रतिनिधी:-

खासदार संजय राऊत हा उद्धवजींना ब्लॅकमेल करतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रॉपर्टी संदर्भात अशी काही कागदपत्र आहेत की त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या मनात आले तरी संजय राऊत यांना गप्प करू शकत नाहीत किंवा त्यांच्याबद्दल कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. असा गौप्यस्फोट भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत केला. जेव्हा संजय राऊत जेलमध्ये होते तेव्हा त्यांचा भाऊ आमदार सुनील राऊत काही कागदपत्रांसाठी सामनामध्ये आला असता ठाकरेंनी ती कागदपत्रे दिली नाहीत तेव्हा संतप्त होऊन माझ्या भावाला जेलमध्ये त्रास झाल्यास उद्धव ठाकरे यांना रस्त्यावर आणू अशी थेट धमकी सामनाच्या गेटवरच दिली होती.आणि धिंगाणा घातला होता. अशी धमकी दिली होती की नाही याचाही त्यांनी खुलासा करावा. उद्धव ठाकरे यांना राऊत ब्लॅकमेल करत असल्याचा घणाघात पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे यांनी केला असल्यामुळे राज्यात खळबळ माजली आहे.

तेजस ठाकरे हे प्राणी,पक्षी,खेकडे, माशे यांचे संशोधन करत आहेत.त्यांना मी सांगेन की अशा प्रण्याच्या संशोधनासाठी इकडे तिकडे जाण्यापेक्षा तुझ्या सामना च्या ऑफिस मध्ये एका वेगळ्या जातीचा सारडा बसला आहे. जो खऱ्या सरड्याला सुद्धा लाज वाटेल अशा पद्धतीने रंग बदलतो. त्या खासदार संजय राऊत यांना पकडून त्यांच्यावर संशोधन कर. आणि दर तासाला कसा रंग बदलतो ? कधी काँग्रेसचा कधी राष्ट्रवादीचा तर कधी कधी उद्धव ठाकरेंचा होतो. एवढा रंग बदलू सडा कसा झाला याचा अभ्यास कर. संजय राऊत म्हणजे महाविकास आघाडीची गौतमी पाटील आहे. गौतमी पाटील तर उत्तम कलाकार आहे. ती लोकप्रिय आहे मात्र याचा सकाळचा भोंगा एकूण लोक कंटाळले आहे. मी गौतमी पाटील ला विंनाती करेन राऊत यांना तुझे मेकापचे साहित्य दे जेणे करून त्यांचे थोबाड चागलं रंगेल.अशा शब्दात भाजपा नेते आमदार नितेश राणे यांनी टीका केली.

कणकवली येथे पत्रकारांशी संवाद साधताना आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांचा समाचार घेताना म्हणाले आज सकाळी खासदार गजानन भाऊ कीर्तीकर यांच्यावर संजय राऊत यांचे प्रेमउतू जात होते. याच खासदार कीर्तीकर यांचा तुझ्या मालकाने किती वेळा आपमनित केला हे सर्वांना माहिती आहे. मुख्यमंत्री असताना तासनतास बसवून ठेवायचे आणि ठाकरे भेट द्यायचेच नाहीत.भाजपा युती असताना तुझा मालक आणि त्याच्या मुलांना किती मन संमांब द्यायचे हे तुम्हाला आता कळले असेल.तुम्हाला खुर्चीतून सोप्यावर आणले तेव्हा असे सांगून,युती असताना. देवेंद्र फडणवीस यांनी मातोश्री २ च्या आणि ठाकरे ट्रस्ट च्या परवानग्या मिळवून दिल्या म्हणून तर आज तुम्ही तरला आहात.

महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचे चॉकलेट देवून, मुख्यमंत्री ठाकरेंचे सरकार केले मात्र अजित दादा कडे अर्थमंत्री पद होते. तेव्हा किती विकास निधी दिला तुमच्या आमदारांना ते जाहीर करा.सर्वात कमी निधी शिवसेनेच्या आमदारांना मिळााला होता.आणि आज भाजपा बद्दल बोलता.अशा शब्दात आमदार नितेश राणे यांनी सुनावले.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे भेटायला जे आमदार गेले होते ते काय बोलत होते पहा.ते सुद्धा शकुनी मामा ही उरलीसुरली सेना संपविणार आहे.याचीच खात्री देत होते.अशी टीका केली.

शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार भाजप युती मध्ये समाधानी आहेत. कोणीही परत तुमच्याकडे येणार नाही. उद्धव ठाकरे एक महिन्यासाठी लंडन ला जात आहे.त्यांना खरच सुट्टीची गरज आहेच. तुम्ही लंडन वरून व्हाया स्विझर्लंड ला तर जाणार नाही ना ? तिथे चतुर्वेदी तुमचा काळा पैसा लपवण्यासाठी भेटणार आहे.त्यामुळे तुम्ही जाच.मात्र परत आल्यावर आमदार किती असतील त्याचा अनुभव घ्यावा. सकाळी वाजणाऱ्या भोंग्याला कंटाळून सर्व आमदार जाणार आणि आदित्य आणि उद्धव जी हे दोघेच पक्षात असणार आहे.

गजानन किर्तीकर हे हाडाचे शिवसैनिक आहेत संजय राऊत यांच्यासारखे दलाल नाहीत.आज अमोल कीर्तीकर यांना वडिलांविरुद्ध निवडणूक लढवण्यास उभे करून घरात वाद निर्माण करत आहेत याच उद्धव ठाकरेंना स्वतःच्या घरातील वादाबद्दल बोललेले आवडत नाही नंतर दुसऱ्यांच्या घरात आग लावण्याचे काम येते.

भाजपने सोबत घेतलेल्या नेत्यांना मानसन्मानच दिला:-

कोर्टात जाण्यापूर्वी उबाठा सेनेला कोर्ट चांगले असते इलेक्शन कमिशन चांगलं असतं. मात्र निर्णय विरोधात गेला की त्याच कोर्टाला शिव्या घालण्याचे काम करतात त्यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्तारावर ज्यांना कोर्टात जायचे आहे त्यांना लोकशाहीने दिलेले अधिकार आहेत ते वापरावे असे एका प्रश्नावर बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले.

भाजपने अनेक नेत्यांना मानसन्मान दिला आहे भाजपसोबत गेलेल्यांना पदे मिळालेले आहेत याचे उत्कृष्ट उदाहरण केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा मंत्री गावित साहेब असतील असे अनेक उदाहरणे देता येतील ज्यांना भाजपने दिलेला शब्द पाळला आणि सन्मानही केलेला आहे.

द रशियन स्टोरी….,संजय राऊत च्या वाढदिवसाला हा नवा चित्रपट प्रदर्शित करणार आहोत.पाहायला येणार काय ते सांगावे असा टोला हाणला.२०२४ ला विनायक राऊत सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार असणार नाहीत हे मी प्रतिज्ञापत्रावर लिहून देतो असेही एका प्रश्नावर बोलताना नितेश राणे म्हणाले.