अशी ही फसवणूक…कधी संपणार अंधश्रद्धा,कणकवलीतील प्रकाराने सारेच आवाक

8

कणकवली /प्रतिनिधी

तुमच्या दवाखान्याला, दुकानाला, कार्यालयाला भूतबाधा झाली आहे. अमुक तमूक विधी केल्यास तुमची भरभराट होईल असे सांगून कोल्हापूरच्या एका महिलेने कणकवली शहरासह लगतच्या गावातील अनेकांची फसवणूक केली आहे. मात्र याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यास कुणी धजावलेले नाही. सुमारे ४० ते ४५ वयोगटातील ही महिला दुकान अथवा कार्यालयात जावून भूतबाधा, भानामती होत असल्याचे सांगत असल्याची बाब गेल्या दोन दिवसांत उघड झाली. अनेकांनी हा अंधश्रद्धेचा प्रकार सांगून तिला माघारी पाठवले. तर काही जण मात्र तिच्या लाघवी बोलण्यामध्ये फसले गेले. शहरालगतच्या एका ग्रामपंचायत कार्यालयातही या महिलेने काल ठिय्या मांडला होता. गावातील महिला-पुरूषांना एकत्र करा. त्यांच्या भल्यासाठी काही विधी करूया असा आग्रह देखील तिने धरला होता. माआहे त्र त्या जागरूक महिला सरपंचांनी तिला तेथून बाहेरचा रस्ता दाखवला. दरम्यान त्या भानामती महिलेच्या कारनाम्याची चर्चा सुरु आहे.