राजपाल गोविंद मुंबरकर एल.जी.एस या परीक्षेत भारतातून आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण

24

देवगड/ प्रतिनिधी
देवगड तालुक्यातील मिठमुंबरी येथील राजपाल गोविंद मुंबरकर (सध्या रा.मुंबई) हे एल.जी.एस (लोकल गव्हर्नमेंट सर्व्हिस) या परीक्षेत भारतातुन आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
महानगर पालिकेतील अधिकारी संवर्गातील पदावर कार्यरत असणाऱ्या पदासाठी एल.जी.एस परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते. या परीक्षेचा अभ्यासक्रम महानगरपालिका, नगरपालिका व नगरपरिषद तसेच स्थानिक सरकारच्या कारभारावर आधारित असतो. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या शासकीय संस्थेच्या नाशिक केंद्राचा फेब्रुवारी-२०१९ च्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून मुंबरकर यांनी देशात आठवा क्रमांक पटकावला आहे. मुंबरकर हे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात वरीष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. आनंद विकास मंडळ मिठमुंबरी, बुद्ध विहार बांधकाम समिती मुंबईच्या अध्यक्षपदी ते काम पाहत आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.