आ. नितेश राणे यांचा खारेपाटण-चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीतर्फे  सत्कार

8

खारेपाटण-ता १५

तिथवली-चिंचवली दरम्यानच्या सुखनदी पुलाच्या बांधकामासाठी ४ कोटी ९० लाखांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आ. नितेश राणे यांचा खारेपाटण-चिंचवली रेल्वे स्टेशन संघर्ष समितीतर्फे  सत्कार करण्यात आला. यावेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष नासीर काझी, सरचिटणीस सुर्यकांत भालेकर आदी पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. वैभववाडी, देवगड, राजापूर, कणकवली या चार तालुक्यातील तसेच आसपासच्या ६० गावांतील नागरीकांची खारेपाटण चिंचवली रेल्वे स्टेशनकडे जाताना होणारी गैरसोय या पुलामुळे दूर होणार आहे.