पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला शासनामार्फत पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या मदतीचा आढावा

13

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज सकाळी शिरसिंगे आंबोली गावांना भेटी देऊन तेथील भागाची पाहणी केली डोंगर कोसळण्याचे प्रकार नेमके कशामुळे झाले याबाबत भूगर्भ तज्ञांकडून मत घेतले जाईल असे सांगून शासनाकडून सर्वतोपरी मदत पूरग्रस्तांना पुरविण्यात येईल असे स्पष्ट केले
यावेळी आढावा बैठक कुडाळ येथे पालकमंत्री दीपक केसरकर जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे खासदार विनायक राऊत व इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धतेबाबत आढावा घेण्यात आला व पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे त्वरित वितरण करावे अशा सूचना पालकमंत्री केसरकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या वीज वितरण अधिकाऱ्यांनी जा गावात वीज बंद आहे त्या गावातील कामे तातडीने आटपून वीज प्रवाह सुरळीत करावा अशा सूचना केल्या
कोणत्याही परिस्थितीत पूरग्रस्तांना शासन उघड्यावर सोडणार नाही अशी हमी पालकमंत्री केसरकर यांनी यावेळी बोलताना दिली