देशी गोपालक शेतक-यांचा बुधवारी वैभववाडीत मेळावा

21

वैभववाडी/ प्रतिनिधी:-
देशी गायींचे उत्पादन वाढविणे व त्यांचे अध्यात्मिक शेती, पर्यावरण आरोग्य व अर्थिकदृष्ट्या महत्त्व पटवून देण्यासाठी बुधवारी १४ ऑगस्ट  सकाळी पंचायत समिती सभागृहात देशी गोपालक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
देशी गोपालक शेतकरी उत्पादक कंपनी आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने हा मेळावा आयोजित करण्यात आला असून मेळाव्यात शासनाच्या चांदा ते बांदा तसेच अन्य विविध योजनांची माहीती शेतक-यांना दिली जाणार असून देशी गोपालनाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
त्यामुळे तालुक्यातील देशी गोपालक शेतक-यांनी मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन सभापती लक्ष्मण रावराणे व गव्यसिध्द तथा शेतकरी संघाचे अध्यक्ष  महेश संसारे यांनी केले आहे.