कुडाळ तालुका संजय गांधी निराधार समीतीची सभा संपन्न

15

कुडाळ :- प्रस्तावांना कायद्याचा किस न काढता गरीबांचे प्रस्ताव मंजूर करा असे आमदार वैभव नाईक यांच्या सुचना आहेत- अतुल बंगे

संजय गांधी निराधार समीतीची सभा नुकतीच समीतीचे अध्यक्ष अतुल बंगे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली यावेळी तहसीलदार मच्छिंद्र सुकटे, समीती सदस्य बब्रुवान भगत, जगदीश उगवेकर, अनुप्रती खोचरे, सौ तोरसकर उपस्थित होते समीती समोर एकूण ३५प्रकरणे ठेवण्यात आली त्यातील २९ प्रकरणे मंजूर करण्यात आली यावेळी गरीब लोकांना या योजनेचा फायदा व्हावा म्हणून प्रस्तांवामध्ये तांत्रिक त्रुटी काढुन प्रस्ताव नामंजूर न करता ते मंजुर करा अशा सुचना आम नाईक यांनी दिल्या असल्याची माहिती बंगे यांनी दीली