विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे २८ ऑगस्ट रोजी उद्घाटन

47

कणकवली / प्रतिनिधी

विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसीचे बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे याबाबत आमदार वैभव नाईक यानी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, उद्योजक सतीश नाईक यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे .युवक कल्याण संघ संस्थेच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी उभारलेय विजयराव नाईक फार्मसी कॉलेज AICTE , PCI नवी दिल्ली मान्यताप्राप्त आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ व MSBTE संलग्न आहे फार्मसी कॉलेज , कै. विजयराव नाईक यांचे शैक्षणिक क्षेत्रात आहे मोठे योगदान आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षण संस्थांना विजयराव नाईक यांनी आहे सढळ हस्ते मदत केली होती त्यामुळेच वडील कै.विजयराव नाईक यांच्या नावानेच सुरू केलेय फार्मसी कॉलेज असे नाईक यानी केले स्पष्ट. डी. फार्मसी आणि बी.फार्मसी चे कोर्स आहेत उपलब्ध ,पहिल्याच वर्षी डी फार्मसी ला ६० तर बी. फार्मसी कॉलेजला ५० विद्यार्थ्यांनी घेतलाय प्रवेश आगामी काळात संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांचे केले जाणार मार्गदर्शन कॉलेज निर्मितीसाठी डॉ. रमण बाणे आणि प्रा. मंदार सावंत यांचे लाभले विशेष सहकार्य ,कॉलेजसाठी उच्चशिक्षित १० प्राध्यापकांचा आहे स्टाफ ,त्यासोबतच ७५ लाख रुपये गुंतवणूक केलेली अद्ययावत लॅबोरेटरी आणि लायब्ररीही आहे उपलब्ध विद्यार्थ्यांच्या निवासासाठी हॉस्टेल ची केली आहे सोय , आमदार वैभव नाईक यांची माहिती . कणकवली शहरालगत शिरवल गावात फार्मसी कॉलेजची उभी राहिलीय प्रशस्त इमारत , यावेळी प्रा. मंदार सावंत, प्रा. मेघा बाणे, संचालक महेश देसाई, संजय ढेकणे, भास्कर राणे, प्रा. जागृती राणे, प्रा.पूजा पटेल आदी होते उपस्थित .